Diabetes Tips : डायबिटीजच्या रुग्णांना नैसर्गिकरित्या मिळेल इन्सुलिन, फक्त खा ही 6 प्रकारची पानं
मधुमेहाच्या रूग्णांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्यांना अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला काही पानांच्या मदतीने रक्तातील नियंत्रित ठेवता येते.
कढीपत्ता : कढीपत्त्यातील फायबर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि इन्सुलिन देखील वाढते. मधुमेहींनी रोज सकाळी 10 पाने चावून खावी किंवा कढीपत्त्याचा रस प्यावा.
2/ 7
अश्वगंधा : या पानांच्या मदतीने ब्लड शुगर नियंत्रित केली जाऊ शकते, ही पानं उन्हात सुकवून नंतर बारीक करा आणि त्याची पावडर बनवा. कोमट पाण्यात हे पावडर टाकून पिणे डायबिटीजसाठी फायदेशीर ठरेल.
3/ 7
कडुलिंब : मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात करण्यासाठी रोज सकाळी कडुनिंबाची पाने चघळायला सुरुवात करावी. याशिवाय त्याचा रस काढून प्यायल्यासही ते फायदेशीर ठरते.
4/ 7
मेथी : मेथीच्या पानांमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. मेथीची पानं आणि मेथीचे दाणे हे दोन्हीही मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते. ते रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करतात.
5/ 7
ओरिगॅनो : ओरिगॅनोची पानं अधिक इंसुलिन बनवण्यासाठी मदत करते, गोड खाण्याची इच्छाही कमी करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
6/ 7
आंबा : आंब्याच्या पानांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पेक्टिन असते, ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. आंब्याची पानं पाण्यात उकळवा. हे पाणी रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी गाळून प्या.
7/ 7
आफ्रिकन बिटर लीफ : आफ्रिकन कडू पानांच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते, असेही एका संशोधनात सांगितले गेले आहे.