

तुम्ही एखादं सामान ऑनलाइन मागवलं की त्याची होम डिलीव्हरी करण्यासाठी तुमच्या दारात डिलीव्हरी बॉय येतो. मात्र यापुढे लवकरच ड्रोन तुमचं सामान घेऊन तुमच्या घरी येणार आहे.


जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन (Amazon) लवकरच तुमच्या घरी ड्रोनने सामानाची डिलीव्हरी (Drone Delivery) करणार आहे. ड्रोन डिलीव्हरीमार्फत (Drone Delivery) 30 मिनिटांत सामान तुमच्या घरी पोहोचणार आहे.


अमेरिकेच्या Federal Aviation Administration ने ॲमेझॉनला ड्रोनमार्फत पॅकेज डिलीव्हरीसाठी परवानगी दिल्याचं सांगितलं आहे.


ॲमेझॉन सध्या ड्रोनचं उड्डाण आणि इतर परीक्षण सुरू आहे. ड्रोनमार्फत कधी डिलीव्हरी सुरू केली जाणार हे अद्याप सांगू शकत नाही असं कंपनीनं सांगितलं आहे.


याच्या ऑपरेशन सेफ्टीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि एफएएसमोर प्रदर्शनही करावं लागणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.


ॲमेझॉन जगातील कित्येक देशांमध्ये एका दिवसात डिलीव्हरी करतं. डिलीव्हरी टाइम आणखी कमी करावा, हा कंपनीचा उद्देश आहे.