काकडी खाल्ल्यानंतर तुम्ही काकडीची साल टाकून देता ना? पण लवकरच या काकडीची प्लॅस्टिकला पर्याय म्हणून वापरात येण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, काकडीच्या सालामध्ये सेल्युलोजचं प्रमाण जास्त असतं. या सालापासून काढलेल्या सेल्युलोज नॅनोक्रिस्टल्सचा वापर अन्नाचं पॅकेजिंग करण्यासाठी केला जाऊ शकतो.