प्रेग्नन्सीत कोरोना झाल्यास बाळाला कोरोनाचा धोका किती? आता नवी माहिती समोर आली
प्रेग्नन्सीमध्ये (Pregnancy) कोरोना (coronavirus) कोणत्या स्वरूपाचा आहे यावर त्याचा प्रेग्नन्सीमध्ये होणारा आणि बाळावर (baby) होणारा दुष्परिणाम अवलंबून आहे.
|
1/ 11
प्रेग्नन्सीत कोरोना झाल्यास त्याचा बाळाला किती धोका आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत अनेक संशोधन सुरू आहेत. याआधीदेखील काही संशोधन समोर आले आहेत आणि आता नव्यानं झालेल्या एका संशोधनात नवी माहिती समोर आली आहे.
2/ 11
ज्या महिलांना गरोदरपणात कोरोनाची लागण झाली, त्यांच्या बाळांना कोरोनाची गंभीर लक्षणं बळावण्याचा धोका कमी आहे, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे. जामा जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
3/ 11
संशोधकांनी मार्च ते ऑगस्टपर्यंत 3,374 मातांचा अभ्यास केला. त्यापैकी 252 महिला गरोदरपणात कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या आढळल्या.
4/ 11
252 कोरोनाग्रस्त महिलांपैकी 95 टक्के महिलांमध्ये सुरुवातीला सौम्य लक्षणं होत किंवा लक्षणंच नव्हती. तर 6 महिलांमध्ये गंभीर लक्षणं होती किंवा त्यांच्यामध्ये कोव्हिड 19 संबंधित न्यूमोनिया होता.
5/ 11
प्रेग्नन्सीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 95 टक्के महिलांमध्ये त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. तसंच गर्भातील बाळामध्ये आईमार्फत कोरोनाव्हायरसचं संक्रमण होण्याची प्रकरणंही फक्त तीन टक्केच असल्याचं संशोधकांना दिसून आलं.
6/ 11
ज्या महिलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत किंवा लक्षण नाहीत अशा महिलांच्या बाळाला कोरोनाव्हायरसची लागण होण्याचा धोका कमी आहे.
7/ 11
कोरोनाग्रस्त आणि कोरोना नसलेल्या गरोदर महिलांची तुलना केली असता कोरोनाव्हायरसमुळे प्रेग्नन्सी, डिलीव्हरी आणि बाळाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम बळावण्याचा धोका वाढत नसल्याचं स्पष्ट झालं.
8/ 11
मात्र ज्या महिलांची गर्भारपणाच्या 37 आठवड्यांआधाची प्रकृती गंभीर झाली आहे त्यांचं बाळ वेळेआधीच जन्मण्याची प्रकरणं अधिक आहेत. महिलांची प्रकृती गंभीर होण्यात मधुमेह कारणीभूत ठरत असल्याचंही निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं.
9/ 11
संशोधनाचे अभ्यासक एमिली अधिकारी यांनी सांगितलं, प्रसूती झालेल्या सर्व कोरोनाग्रस्त महिलांपैकी फक्त 5 टक्के महिलांची प्रकृती गंभीर होती, असं आम्हाला आमच्या अभ्यासात दिसून आलं.
10/ 11
घरीच उपचार घेत असलेल्या आणि कोरोनातून बऱ्या होत असलेल्या प्रेग्नंट महिलांसाठी एक गाइडलाइन्स तयार करण्याचा आमचा उद्देश असल्याचं अधिकारी यांनी सांगितलं.
11/ 11
आई आणि बाळाच्या आरोग्यावर कोव्हिड-19 चा दीर्घकाळ काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचंही संशोधक म्हणाले.