2015 मध्ये प्यू रिसर्च सेंटर अॅनालिसिसने एक अहवाल जारी केला होता. त्यामध्ये जगातील कोणत्या देशांमध्ये गर्भपात करणे फार कठीण आहे, हे सांगितले गेले. गर्भपात केलाच तर त्याला सरळ गुन्हा ठरवले जाते. डोमिनिकन रिपब्लिक, अल साल्वाडोर, निकाराग्वा, व्हॅटिकन सिटी आणि माल्टा यासारख्या देशांमध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्भपाताला परवानगी नाही, असे या अहवालात सांगण्यात आलं आहे.