आता सहजासहजी शरीरात घुसू शकणार नाही CORONA; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) अभ्यासात संशोधकांना मिळालेलं हे मोठं यश आहे.
|
1/ 8
कोरोनाव्हायरस आपल्या शरीरात जाऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरचा वापर करतो. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची काळजी घेतो. आता संशोधकांनी कोरोना शरीरात घुसण्यापासून रोखण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे.
2/ 8
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक असा रासायनिक घटक शोधून काढला आहे, जो कोरोनाव्हायरसला मानवी शरीरात प्रवेश करण्यापासून आणि आपल्यासारखे आणखी व्हायरस तयार करण्यापासून रोखू शकेल.
3/ 8
सार्स-कोव-2 व्हायरस टप्प्याटप्प्याने शरीरावर हल्ला करतो. सुरुवातीला तो फुफ्फुसात प्रवेश करतो आणि त्यानंतर मानवी शरीरातील पेशींवर ताबा मिळवतो आणि आपल्यासारखे अनेक व्हायरस निर्माण करतो. कोरोना संक्रमणातील हे दोन टप्पे खूप महत्त्वपूर्ण आहेत.
4/ 8
कोरोनाव्हायरसला मानवी शरीरात हल्ला करण्यासाठी लाइजोसोमल प्रोटीज कॅथेप्सीन एल आणि एप्रो हे दोन प्रोटिन आवश्यक असतात.
5/ 8
संशोधकांना दिसून आलं की त्यांनी शोधलेला रासायनिक घटक कोरोनाव्हायरससाठी आवश्यक असलेल्या या दोन प्रोटीनला प्रतिबंध करण्यात सक्षम आहे.
6/ 8
मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी आवश्यक असलेल्या लाइजोसोमल प्रोटीज कॅथेप्सीन एल प्रोटीन आणि पेशींमध्ये व्हायरस निर्मिती करणारा मुख्य प्रोटीन एप्रोला हा रासायनिक घटक प्रतिबंध करू शकतो.
7/ 8
अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा हेल्थ आणि युनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाच्या शास्त्रज्ञांनी हीच प्रक्रिया रोखण्यासाठी अभ्यास केला. सायन्स अॅडवान्सरेजमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
8/ 8
त्यामुळे या रासायनिक घटकाचा वापर करून कोरोनाविरोधातील प्रभावी लस तयार करण्यात मदत मिळेल, अशी आशा संशोधकांना आहे.