OMG! फक्त एक चमचा CORONAVIRUS पडला भारी; संपूर्ण जगाची वाट लावली
आतापर्यंत जगभरातील कोरोना संक्रमित रुग्णांची आकडेवारी आपण पाहत आलो आहोत. मात्र जगभरात Coronavirus किती प्रमाणात आहे, याचा विचार कधी केला का?
|
1/ 6
जगभरात सध्या कोरोनाव्हायरसचे 5 कोटी 60 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. मात्र इतक्या लोकांना संक्रमित करणारा कोरोनाव्हायरस फक्त एका चमच्यावर मावेल इतकाच आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
2/ 6
कोरोनाव्हायरस उघड्या डोळ्यांना दिसत नाही हे आपणा सर्वांना माहिती आहे. अदृश्य असलेला हा कोरोनाव्हायरस जगभर थैमान घालतो आहे. त्यामुळे जगभरात नेमकं कोरोनाव्हायरसचं प्रमाण किती आहे, याचा अभ्यास करण्यात आला.
3/ 6
ऑस्ट्रेलियातील गणित तज्ज्ञ मॅट पार्कर (Matt Parker) यांनी एक फॉर्म्युला तयार केला आणि त्यानुसार जगातील कोरोनाव्हायरसचं प्रमाण मोजलं.
4/ 6
माहितीनुसार, मानवी पेशीचा आकार जवळपास 100 मायक्रोमीटर म्हणजे आपल्या डोक्यावरील केसांच्या आकाराच्या एक चतुर्थांश असतो आणि कोरोनाव्हायरसपेक्षा 10 लाख पटीनं अधिक आहे. यावरून कोरोनाव्हायरसच्या आकारचा अंदाजा येईलच.
5/ 6
पार्कर यांनी सर्वात आधी शरीरात किती प्रमाणात कोरोनाव्हायरस असल्यास ती व्यक्ती संक्रमित होती हे तपासलं. त्यानंतर फॉर्म्युल्यानुसार त्यांनी संपूर्ण जगात किती कोरोनाव्हायरस आहे याची गणना केली.
6/ 6
संपूर्ण जगात जवळपास 8 मिली लीटर कोरोनाव्हायरस आहे. एका चमच्याची क्षमता जवळपास 6 मिलीलीटर असते. याचा अर्थ जगभरातील कोरोनाव्हायरस एका चमच्यावर सामावेल इतकाच आहे.