कपल्सनी नक्की करायला हवीत ही कामं, लॉकडाऊनमध्ये नात्यात येणारा नाही दुरावा
ही वेळ अशी आहे ज्यात तुम्ही एकमेकांसोबत सर्वाधिक वेळ घालवत आहात. त्यामुळे यात प्रेमासोबत तणाव सुद्धा येऊ शकतो.
|
1/ 9
कोरोना व्हायरसनं सध्या सर्वांचं जगणं कठीण करुन ठेवलं आहे. या व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन केल्यानंतर सर्वांना सक्तीनं घरी राहावं लागत आहे. अनेकदा यामुळे आपल्यात नकारात्मकता वाढत असते. पण याचा परिणाम आपल्या नात्यांवर होऊ द्यायचा नसेल प्रत्येक कपलनं ही कामं करायलाच हवीत.
2/ 9
घरातली काम, मुलांना सांभळणं किंवा मग ऑफिसचं काम असेल सध्या सर्वच आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये कामाचा ताळमेळ बसवत आहे. अशात तुमच्या नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. पण काही सोप्या गोष्टींनी तुम्ही तुमचं नातं मजबूत बनवू शकता.
3/ 9
पार्टनरसोबतच नातं मजबूत ठेवायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. स्वतःला तणावमुक्त ठेवा. काही वेळ एकांतात घालवा. पुस्तकं वाचा किंवा मेडिटेशन करा.
4/ 9
कोणतीही समस्या असेल तर आपल्या पार्टनरशी बसून बोला. ती समस्या कशी सोडवायची यावर चर्चा करा. जबाबदाऱ्या समप्रमाणात वाटून घ्या. पुढच्या दिवसाची सुरुवात कशी करायची हे एकत्र बसून ठरवा.
5/ 9
अनेकजण वर्क फ्रॉम होम असल्यानं कामाचा अतिरिक्त ताण आहे. पण यामध्ये आपल्या पार्टनरकडे दुर्लक्ष करु नका. काम करत असताना पार्टनरशी अधेमधे आवश्य बोला. एखादवेळी स्वतः कॉफी बनवून पार्टनरला द्या.
6/ 9
ही वेळ अशी आहे ज्यात तुम्ही एकमेकांसोबत सर्वाधिक वेळ घालवत आहात. त्यामुळे यात प्रेमासोबत तणाव सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे शक्य होईल तेव्हा एकमेकांना स्पेस द्या. काम करताना एकत्र बसू नका.
7/ 9
पार्टनरला स्पेस द्या. त्याला त्याच्या आवडीचं काम करु द्या. काही वेळ त्याला एकटं राहू द्या. वेगवेगळ्या रुममध्ये बसून आपल्या आवडीची काम करा. जसं पुस्तक वाचणं, वेब सीरिज पाहाणं.
8/ 9
कोणताही पार्टनर परफेक्ट नसतो. पण सध्या प्रत्येकजण आपला पूर्ण वेळ आपल्या पार्टनरला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांची दाद आवश्य द्या. तुमची छोटीशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे.
9/ 9
स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी बागकाम करा. दोघांनी एकत्र काही वेळ बागकामासाठी दिल्यास जास्त चांगलं. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि तुम्ही सुद्धा फ्रेश राहता. (संकलन : मेघा जेठे.)