शरीरावरअल्कोहोल किंवा क्लोरिन लावल्याने कोरोनाव्हायरस नाश होतो का? - नाही. तुमच्या शरीरात कोरोनाव्हायरसने प्रवेश केला असेल, तर शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरीन लावल्याने व्हायरस मरत नाहीत. असं काही शरीरावर स्प्रे केल्यास हानीकारक ठरू शकतं. एखादी जागा किटाणूमुक्त करण्यासाठी तुम्ही अल्कोहोल, क्लोरिन वापरू शकता मात्र योग्य सल्ल्यानुसार त्याचा वापर करा.
पाळीव प्राण्यांमुळे कोरोनाव्हायरस होतो का? - अद्याप तरी कुत्रा, मांजर यामुळे कुणा व्यक्तीला कोरोनाव्हायरस झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. मात्र तरीदेखील प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवायला हवेत. यामुळे प्राण्यांपासून माणसांकडे जाणाऱ्या ई-कोलीसारख्या इतर बॅक्टेरियांपासून तुमचं संरक्षण होईल.
न्यूमोनियाची लस कोरोनाव्हायरसपासून तुम्हाला संरक्षण देईल? - कोरोनाव्हायरसची सुरुवातीची लक्षणं न्युमोनियाप्रमाणे असली तरी हा व्हायरस नवा आणि वेगळा आहे. न्यूमोनियाची लस तुम्हाला कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे त्यासाठी त्याला मारक ठरेल अशा लसीची गरज आहे आणि कोरोनाव्हारसविरोधातील लस तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
खाऱ्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने कोरोनाव्हायरसचा इन्फेक्शन होणार नाही? - दररोज खारट पाण्याने नाक स्वच्छ केल्याने साध्या सर्दीपासून आराम मिळतो, असे काही पुरावे आहेत. मात्र त्यामुळे श्वसनसंबंधी इन्फेक्शनपासून संरक्षण मिळेल असं अद्याप तरी दिसून आलं नाही. नियमित खारट पाण्याने नाक स्वच्छ केल्याने कोरोनाव्हायरसच्या इन्फेक्शनपासून संरक्षण मिळेल, असे पुरावे नाहीत.
कोरोनाव्हायरसवर अँटिबायोटिक्सने उपचार होतात? - अँटिबायोट्किस व्हायरसवर नाही तर फक्त बॅक्टेरियांविरोधात प्रभावी आहे. कोरोनाव्हायरस हा व्हायरस आहे, म्हणजे अँटिबायोटिक्स प्रतिबंधात्मक उपचार म्हणून प्रभावी नाही. मात्र कोरोनाव्हायरस झाल्यानंतर रुग्णालयात असताना अँटिबायोटिक्स दिले जातात कारण तुम्हाला बॅक्टेरियअल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.