पुणे शहरात (Pune City) गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. यामुळे पुणेकरांना एक दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याच दरम्यान पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (Pune rural area) कोरोनाने (Coronavirus spike) अक्षरश: थैमान घातलं आहे.
2/ 12
ग्रामीण भागात केवळ बाधितांच्या संख्येत वाढ होत नाही तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना रांगा (waiting for funeral) लावाव्या लागत आहेत.
3/ 12
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता उपाययोजनांबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
4/ 12
पुण्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानुसार लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
5/ 12
पुण्यात कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासन आवश्यक ते प्रयत्न करत आहे मग नागरिकांनीही बेसावध होऊन चालणार नाही. त्यांनीही खबरदारी घ्यायला हवी.
6/ 12
रुग्णसंख्या कमी झाली म्हणून तोंडावरील मास्क हटवू नका. N95, कापडी, सर्जिकल जो कोणताही मास्क तुमच्याकडे असेल तो वापरा. तज्ज्ञांनी डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिल्ला आहे.
7/ 12
सुरुवातीला तुम्ही सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला पण आता तुमच्या खिशातील, बॅगेतील सॅनिटायझरची बाटली एका कोपऱ्यात पडलेली असेल. ती आधी तुमच्या सोबत ठेवा आणि गरजेनुसार त्याचा वापर करा.
8/ 12
कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तर राखाच पण घरातही आवश्यक ती काळजी घ्या. विशेषत: घरीच कोरोना रुग्ण असल्यास जास्त काळजी घ्या.
9/ 12
नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नका. कारण इथूनच कोरोना तुमच्या शरीरात प्रवेश करतो.
10/ 12
बाहेरून घरी आल्यावर अंघोळ करा, कपडे नीट स्वच्छ करा.
11/ 12
बाहेरून कोणतंही पार्सल मागवलं असेल तर ते सॅनिटायइझ करून घ्या. त्यानंतर तुमचे हातही स्वच्छ करा.
12/ 12
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज असेल तरच घराबाहेर पडा.