काय म्हणताय! फक्त सुई टोचून नाही तर नाकावाटेही घेता येणार कोरोना लस
नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या कोरोना लशीचंही (corona vaccine) लवकरच ट्रायल सुरू होणार आहे. अशी लस कुठे तयार करण्यात आली आहे आणि त्याचं ट्रायल कुठे होणार आहे पाहा.
|
1/ 6
लस म्हटलं की ती सामान्यपणे इंजेक्शनमार्फत किंवा तोंडावाटे दिली जाते. आतापर्यंत ज्या कोरोना लशी ट्रायलच्या प्रगत टप्प्यात पोहोचल्या आहेत, त्यादेखील इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र आता नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या कोरोना लशीचंही ट्रायलही सुरू होणार आहे.
2/ 6
लंडनमधील इम्पिरिअल कॉलेजमधील शास्त्रज्ञ नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या कोरोना लशीचं ट्रायल घेणार आहेत, असं वृत्त बीबीसीने दिलं आहे.
3/ 6
सुरुवातीला दोन जणांवर या लशीची चाचणी होणार आहे. ऑक्सफर्डच्या कोरोना लशीच्या प्रयोगात सहभागी झालेली एक व्यक्ती आणि जून महिन्यात इम्पिरिअल कॉलेजच्या मानवी चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तीचा समावेश असणार आहे.
4/ 6
जगातील 180 जणांवर हे ट्रायल घेतलं जाणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.
5/ 6
या संशोधनाचे प्रमुख ख्रिस चिऊ यांनी सांगतिलं, कोरोनाव्हायरस नाक, घशाद्वारे थेट फुफ्फुसात पोहोचतो. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे जर अस्थमावरील उपचार पद्धतीप्रमाणे कोरोना लस थेट फुफ्फुसात सोडली तर त्याचा अधिक चांगला परिणाम होईल.
6/ 6
तसंच कोरोना विषाणू नाक, घशातील पेशींवर हल्ला करतो, तिथल्या पेशीही कमकुवत होतात. त्यांना मजबूत करण्यासाठीदेखील ही लस फायदेशीर ठरेल, असं ख्रिस चिऊ म्हणाले.