

जगातील सर्वात मोठा कोरोना लसीकरण (corona vaccination) कार्यक्रम भारतात होणार आहे. यासाठी देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांचा समावेश आहे.


कोरोना लसीकरणासाठी (Covid-19 Vaccine) को-विन (CoWin) हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामार्फत लस घेण्यासाठी नोंदणी करता येईल शिवाय संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवलं जाईल. कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे, त्याशिवाय ही लस घेता येणार नाही.


सध्या CoWin अॅपवर पहिल्या टप्प्यात ज्या लोकांना लस दिली जाणार आहे, त्यांचाच डेटा अपलो़ड केला जातो आहे. सर्वसामान्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा ते नोंदणी करू शकतील. आरोग्य मंत्रालय मार्च महिन्याच्या अखेर हे अॅप लाँच करेल.


50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पण इतर आजार असलेल्या आणि 50 पेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्या नागरितांना लस द्यायची आणि नाही द्यायची याबाबत निर्णय घेण्यासाठी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली. .या समितीनं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांना आपला रिपोर्ट दिलेला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


जे लोक आजारी आहेत त्यांनाही लस दिली जाणार नाही. जेव्हा ते लोक आजारातून बरे होतील तेव्हा त्यांना लस दिली जाईल. प्रेग्नंट महिला आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं लसीकरण केलं जाणार नाही आहे. भारत बायोटेकनं 12 ते 18 वयोगटातील मुलांवर लशीचं ट्रायल केलं आहे पण तरी लहान मुलांना लस दिली जाणार नाही.