कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क बंधनकारक आहे. काही लोक सर्जिकल, काही कापडी तर काही जण N-95 मास्क वापरतात. मात्र मास्कमुळे एक समस्या उद्भवते ती म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो.
2/ 7
कित्येक तास मास्क लावून राहणं कुणालाच शक्य होत नाही. मास्कमध्ये हवा खेळती राहत नसल्याने नीट श्वास घेता येत नाही, थकवा जाणवतो, अस्वस्थ वाटतं.
3/ 7
मात्र आता LG ने PuriCare Wearable Air Purifier आणला आहे. या मास्कमधून ताजी आणि स्वच्छ हवा खेळती राहेल, ज्यामुळे श्वास गुदमरणार नाही असा दावा केला जातो आहे.
4/ 7
चेहऱ्याच्या आकाराचा नीट अभ्यास करून हा मास्क तयार करण्यात आला आहे. कोणत्याही चेहऱ्यावर फिट बसेल अशीच या मास्कची रचना करण्यात आली आहे. नाक आणि हनुवटीजवळ लिकेज होणार नाही.
5/ 7
LG PuriCare Wearable Air Purifier हवा शुद्ध करण्यासाठी दोन H13 HEPA फिल्टर वापरतो. बिल्ट इन डुअल फॅनचाही वापर करतो. ज्यामध्ये तीन स्पीड लेव्हल आहे, हवा मास्कच्या आतबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत हा वेग आपोआप कमी जास्त होतो.
6/ 7
मास्कमध्ये 820mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये UV LED लाइटही आहेत, ज्या मास्क चार्ज करू शकतात. फिल्टर रिल्पेलस करण्याची गरज असल्यास LG ThinQ मोबाइल अॅपमार्फत युझर्सला नोटिफिकेशनही पाठवतं.
7/ 7
कंपनीने गुरुवारी सांगितलं कंपनी आपलं युनिक इलेक्ट्रॉनिक मास्क पुढील महिन्यात बाजारात आणणार आहे. 2020 Internationale Funkausstellung Berlin (IFA 2020) मध्ये हा मास्क लाँच केला जाईल.