लॉकडाऊनमध्ये काही कपल्स एकत्र राहण्यासा आनंद लुटत आहेत, तर काही कपल्सचं ब्रेकअप झालं आहे. लॉकडाऊनमध्ये छोट्या छोट्या कारणांवरूनही कपल्समध्ये भांडण झाली आणि त्यामुळे अनेकांनी आपलं रिलेशनशिप संपवलं. मात्र घाईत घेतलेल्या त्या निर्णयाचा आता पश्चाताप होत असेल तर पुन्हा पॅचअप कसं करायचं हा प्रश्न असेल. हे तुटलेलं नातं पुन्हा कसं जोडाल यासाठी टीप्स.
पुन्हा एकदा नीट विचार करा - तुम्हाला पुन्हा पॅचअप का करायचं आहे, याचा नीट विचार करा. आपला एकटेपणा दूर करण्यासाठी जर तुम्ही पॅचअप करत असाल तर चुकीचं आहे. यामुळे तुमचं नातं पुन्हा तुटू शकतं. तुमचं ब्रेकअप का झालं त्याबाबत विचार करा आणि पूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.
प्रेम व्यक्त करा - ब्रेकअपनंतर प्रेम व्यक्त करण्यात थोडा वेळ लागणारच. मात्र तुम्ही प्रेम व्यक्त करण्याचा जुना मार्ग वापरून पाहा. लव्ह लेटर किंवा मेसेजमार्फत स्वत:च्या मनातलं त्याच्यापर्यंत पोहोचवू शकता. एखादी शायरी किंवा गाण्याचे बोल त्यांना डेडिकेट करू शकता आणि तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवून द्या.