मानवी इतिहासात पक्षी (Birds) हे फार पूर्वीपासून माणसांचे सोबती आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पक्ष्यांनी आपल्याला संदेश शेअर करण्यापासून ते मासेमारी किंवा शिकार करण्यापर्यंत साथ दिली आहे. पक्ष्यांनी मानवाला अन्न शोधण्यात मदत केली आहे. परंतु, मानवी हस्तक्षेप आणि हवामानातील बदलांमुळे 1980 पासून युरोपमध्ये पक्षी सातत्याने नाहीसे होत आहेत. आणि तेही हळूहळू नाही, तर परिस्थिती अशी आहे की, गेल्या 40 वर्षांत गायब झालेल्या पक्ष्यांची संख्या 62 कोटींवर पोहोचली आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्सचे रिचर्ड ग्रेगरी सांगतात की, याकडे कोणी लक्ष देत नाही ही देखील चिंतेची बाब आहे, म्हणजेच पक्षी (Birds) गायब होण्याच्या घटना स्पष्टपणे घडत नाहीत, ते हळूहळू लँडस्केपमधून गायब होत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1980 पासून अतिशय गोंडस दिसणार्या चिमण्यांची (Sparrows) संख्या निम्म्यावर आली आहे. आता त्यांची संख्या 60 टक्क्यांनी घटून 7.5 कोटींवर आली आहे. यातील बरीचशी घट शेती (Agriculture) आणि गवताळ वातावरणाशी संबंधित आहे, तरीही असं शहरांमध्येही घडत आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
बर्डलाइफ युरोपच्या संवादाचे अंतरिम प्रमुख एना स्टेनेवा म्हणाले की, सामान्य पक्षी कमी होत चालले आहेत. कारण, मानव ज्या भागांवर अवलंबून आहेत ते साफ करत आहेत. आपली शेती, समुद्र आणि शहरांमधून निसर्गाला दूर लोटले जात आहे. युरोपच्या सर्व सरकारांनी निसर्ग पुनर्संचयित (Nature Restoration) करण्याचे बंधनकारक आणि कायदेशीर लक्ष्य स्थापित केले पाहिजे, अन्यथा, त्याचे परिणाम आपल्या स्वतःच्या प्रजातींसाठी देखील भयानक असू शकतात. असे का होत आहे याची अनेक कारणे असू शकतात. अधिवास नष्ट होणे, कीटकांच्या प्रजातींमध्ये तीव्र घट, प्रदूषण, रोग या सर्व गोष्टी या आपत्तीच्या घटनेला कारणीभूत आहेत. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक).
सध्या पक्ष्यांची ही घट ज्यांची लोकसंख्या खूप जास्त आहे, अशा प्रजातींमध्येच (Species) होत आहे. यापैकी 25 टक्के घट झाली आहे. त्याचवेळी, दुर्मिळ प्रजातींमध्ये, (Rare Species) हे नुकसान 4 टक्के आहे, या अर्थाने या प्रजाती नामशेष (Extinction) होण्याच्या श्रेणीमध्ये येत नाही. आरएसपीबी संवर्धन जीवशास्त्रज्ञ फिओना बर्न्स म्हणतात की सामान्य प्रजाती या बदलामध्ये अधिक योगदान देत आहेत. परंतु, एक छोटासा बदल किंवा तोटा देखील आपल्या इकोसिस्टमचे कार्य आणि संरचनेचे प्रचंड नुकसान करू शकतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
आपल्याकडे पक्षीनिरीक्षणाचा (Bird watching) खूप समृद्ध इतिहास आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. त्यात अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या अभ्यासाचा समावेश आहे. अव्यावसायिक पक्षीशास्त्रज्ञांनी अभ्यासासाठी वापरला जाणारा भरपूर डेटा जमा केला आहे. अशा दोन डेटाबेसमधील माहितीचा वापर करून, बर्न आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युरोपमध्ये वाढलेल्या 445 स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 378 प्रजातींचा अभ्यासात चा समावेश केला. मागील अनेक लहान अभ्यासांनी युरोपमधील हे चिंताजनक संकट ओळखले. दुर्दैवाने अनेक प्रजातींसह संपूर्ण युरोपमध्ये ही प्रवृत्ती चालू राहिली. 2019 मध्ये उत्तर अमेरिकेतील एका अभ्यासात असे आढळून आले की तिथंही असेच काहीसे घडत आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
संशोधकांचे म्हणणे आहे की सर्व संशोधन असे सूचित होते की सर्वजण जैवविविधतेचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाले आहेत. 2020 नंतर जागतिक जैवविविधता बदलामध्ये जाणार्या मानवी समाजाच्या सर्व क्षेत्रांमधील बदलाची पातळी बदलण्यासाठी काम केले पाहिजे. संशोधकांचे म्हणणे आहे की हे पूर्णपणे वाईट बातमी नाही. बर्न आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळले की संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी पक्ष्यांची संख्या वाढतही आहे. सात पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये हा कल दिसून आला नाही. कारण, संवर्धनाबरोबरच कीटकनाशके इत्यादींमध्ये कपात करण्यात आली होती. यावरून आपण जैवविविधतेला आकार देण्यास किती सक्षम आहोत हे दिसून येते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
पक्ष्यांसाठी आपल्या समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, जेणेकरून निसर्ग आणि हवामानाचा प्रश्न सुटू शकेल, असे बर्न सांगतात. आपल्याला लक्ष्य वाढवायचे असून जंगल, तलाव इत्यादींच्या विस्तृत पातळीसह संरक्षित क्षेत्र वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. युरोपियन युनियनमध्ये निसर्ग पुनर्संचयित कायदा बनवला जावा, असे संशोधकांनी त्यांच्या तपासणीसह आग्रह केला आहे. याशिवाय, आपण आपल्या बागांमध्ये वैयक्तिकरित्या नैसर्गिक वनस्पती लावू शकतो. कृत्रिम घरटी ठेवू शकतो. वृक्षारोपण वाढवण्यासारख्या अनेक गोष्टी करता येतील. हे संशोधन इकोलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये प्रकाशित झाले आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)