

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाच्या (Chiranjeevi Sarja) मृत्यूनंतर शांत झालेल्या त्याच्या घरात आज ज्युनिअर चिरंजीवीचा आवाज घुमू लागला आहे. चिरंजीवीची पत्नी मेघना राजने (Meghana Raj) एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे. सोशल मीडियावर ही गोड बातमी देण्यात आली आहे.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/Fimyduniya 66)


चिरंजीवी सर्जा याचं 7 जून रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला तेव्हा त्याची पत्नी मेघना राज 3 महिन्यांची गर्भवती होती. अशात चिरंजीवीच्या निधनामुळे तिला मोठा धक्का बसला होता. मात्र बाळासाठी तिने खंबीरपणे याला तोंड दिलं.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/Fimyduniya 66)


आज चिरंजीवी आणि मेघनाच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं त्यांचं बाळ या जगात आलं आहे. चिरंजीवीचा भाऊ ध्रुव सरजा बाळाला आपल्या हातात घेऊन दिसला.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/Fimyduniya 66)


चिरंजीवीच्या बाळाचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते खूप इमोशन झाले आहेत. चिरंजीवीच्या बाळाला त्याच्या फोटोसमोर नेण्यात आलं. जणू हे बाळ त्याच्या कुशीत आहे आणि चिरंजीवीच्या चेहऱ्यावर आपण बाबा झाल्याचा आनंद दिसून येतो आहे.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/Fimyduniya 66)


याआधीदेखील मेघनाच्या डोहाळ जेवणातील हा फोटो पाहून फॅन्सना गहिवरून आलं होतं. चिरंजीवीच्या निधनानंतर मेघनाचे डोहाळेजेवण पार पडले. या सोहळ्यासाठी मात्र चिरंजीवी यांचं उणीव भासत होती. ही कमी भरून काढण्यासाठी मेघनानं चिरंजीवी यांच्यासारखा पुतळा तयार करून घेतला आणि त्याच्या साथीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.