

पुढील पाच दिवसांत देशात कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लशीला आपात्कालीन मंजुरी दिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ही लस चिम्पांझीच्या विष्ठेपासून तयार करण्यात आली आहे.


ही लस चिम्पांझीच्या कोल्ड व्हायरसपासून तयार करण्यात आली आहे. सायन्स जर्नल वेरी वेल हेल्थमध्ये ही लस नेमकी कशी तयार करण्यात आली याची पूर्ण प्रक्रिया सांगण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - pixabay)


चिम्पाझीच्या विष्ठेतून घेण्यात आलेला एडिनोव्हायरस मानवी शरीरात वेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया करतो. तो मानवी शरीरात कोरोनाव्हायरसचे स्पाइक प्रोटिन बनवण्यासाठी उत्तेजना देतो. त्यामुळे मानवी शरीरात कोरोना संक्रमित न होताच त्याविरोधात अँटिबॉडी तयार होतात. (फोटो सौजन्य - pixabay)


आधीपासूनच अभ्यास करण्यात आलेल्या व्हायरसवरील प्रयोगामुळे ऑक्सफोर्डची कोव्हिशिल्ज फाइझर आणि मॉडर्नापेक्षा जास्त स्वस्त आणि प्रभावी ठरू शकते, अशी आशा संशोधकांना आहे. फाइझर आणि मॉडर्ना लशी व्हायरसच्या मृत RNA च्या मदतीनं तयार करण्यात आल्या आहेत, ही प्रक्रिया खूप महागडी आहे. (फोटो सौजन्य - pixabay)


एपीनं ऑक्सफोर्डचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार कोव्हिशिल्डची साठवणूकही सोपी आहे. यासाठी अति कमी तापमानाची गरज नाही. फ्रिजच्या सामान्य तापमानातही ही लस स्टोअर करता येऊ शकते. त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांसाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य - pixabay)


दरम्यान इटलीतील कंपनी रेईतेरानेदेखील गोरिल्लातील विष्ठेतील एडिनोव्हायरसपासून GRAd-COV2 कोरोना लस तयार केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत युरोपियन युनिअनची इटलीतील कंपनीशी या लशीबाबत चर्चा सुरू होती. मात्र निधीच्या कमतरतेमुळे कदाचित या लशीचं पुढील काम थांबलं असावं. याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. (फोटो सौजन्य - pixabay)