दही आणि ताक कधी घेणं चांगलं हेही जाणून घेतलं पाहिजे. शक्यतो ताप, सर्दी ,खोकला असताना दही ताक घेणं टाळावे. पण असे काही आजार आहेत की ज्यामध्ये दही किंवा ताक पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. बऱ्याचदा डॉक्टर तोंडाची चव नसल्यास दही खाण्याचा सल्ला देतात.