

अनेक सेलिब्रिटी आपल्या पाळीव प्राण्यांसह सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतात. फक्त प्राणी पाळून हे सेलिब्रिटी प्राण्यांवरील प्रेमाचा देखावा करत नाही त्यांचं हे वरवरचं प्रेम नाही तर तशी कृतीही करतात. प्राण्यांवर फक्त प्रेम नाही तर त्यांच्या हक्कासाठीदेखील हे सेलिब्रिटी लढतात. या सेलिब्रिटींनी पेटासाठीही (PETA) फोटोशूट केलं आहे.


सनी लियोनने पेटाच्या मोहिमेसाठी आपला पती डेनिअल वेबरसह एक हॉट आण सिजलिंग फोटोशूट केलं. (फोटो सौजन्य - पेटा इंडिया)


आलिया भट्ट आपल्या मांजरांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आलियाने पेटाच्या मोहिमेसाठीदेखील अशाच अंदाजात दिसली. (फोटो सौजन्य - पेटा इंडिया)


एमी जॅक्सनेदेखीलच फोटोशूट पाहून तर डोळे उघडेच राहतील. फोटोशूट करण्यासाठी करण्यात आलेला हा मेकअप आहे, मात्र यातून खूप मोठा मेसेज देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - पेटा इंडिया)


व्हेजिटेरिअन आहाराला प्रमोट करण्यासाठी अभिनेत्री लारा दत्ताने असा पानांचा अनोखा ड्रेस घातला. (फोटो सौजन्य - पेटा इंडिया)


अभिनेता नील नितीन मुकेश हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराचं भाष्य करत हत्तींचं समर्थन केलं. (फोटो सौजन्य - पेटा इंडिया)


शाहिद कपूरही पेटाच्या कॅम्पेनमध्ये व्हेजिटेरिअन फूडला प्रमोट करताना दिसून आला. (फोटो सौजन्य - पेटा इंडिया)