या कारणांमुळे होऊ शकतो कॅन्सर, आयुष्यातील 'हे' छोटे-छोटे बदल करतील बचाव
सध्याच्या काळात लोकांचे लाइफस्टाइल खूप बदललाय आहे. व्यस्ततेमुळे लोकांना आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर सारखे आजार बळावतात.
आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे जगभरातील मोठ्या संख्येने लोक त्रस्त आहेत.
2/ 9
आज आम्ही तुम्हाला कॅन्सरची काही कारणं आणि त्यापासून बचावासाठी तुम्ही कोणत्या चांगल्या सवयींचा अवलंब करू शकता हे सांगणार आहोत.
3/ 9
कॅन्सरची काही प्रमुख कारणं म्हणजे दारू, तंबाखू, कार्सिनोजेन्स जसे की विषाणू आणि रसायने. त्याचबरोबर अतिनील किरण, पर्यावरणीय विकिरण, वायू प्रदूषण, अस्वास्थ्यकर अन्न जसे की, जंक, कॅन केलेले, जास्त गोड आणि पिष्टमय पदार्थ. तसेच वृद्धत्व, लठ्ठपणा हेदेखील कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते.
4/ 9
कॅन्सरपासून वाचण्यासाठी तुम्ही शरीर निरोगी राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणं आवश्यक आहे.
5/ 9
हवेतील अनारोग्यकारक घटकही कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा संपर्क टाळा.
6/ 9
प्रदूषणाव्यतिरिक्त सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळेही कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त काळ या किरणांच्या संपर्कात राहाणे टाळा आणि सनस्क्रीन वापरा.
7/ 9
जंक फूड, फास्ट फूड, तेलकट अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, कॅन केलेला आणि पिष्टमय पदार्थ खाणे टाळा. त्याचबरोबर चायनीज, पिझ्झा, बर्गर, पास्ता, मिठाई, नमकीन, सोडा, बेकरी आयटम आणि कोलापासून दूर रहा
8/ 9
कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज व्यायाम करण्याची सवय लावा. यामुळे तुमचा कॅन्सरपासूनही बचाव होईल.
9/ 9
कॅन्सरपासून बचावासाठी निरोगी राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही संतुलित आहार घ्यावा. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करणेदेखील तितकेच महत्वाचे आहे.