पाळीव प्राण्यांचं वर्तन (Domestic Animals' Behaviour) हा या शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. ते माणसांशी भावनिकदृष्ट्या कसे जोडले जातात? त्यांना मानवी शब्द किंवा हावभाव कितपत समजतात? काही प्राणी प्रशिक्षणानंतर त्यांच्या क्षमतेनं आपल्याला चकित करतात. मांजरींच्या वर्तनानेही बऱ्याच वेळा आपण आश्चर्यचकित होतो. अलीकडच्या वर्षांत, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की, मांजरींचे मानवांशी जवळचे संबंध आहेत. त्या मानवांशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधू शकतात. एका नवीन अभ्यासात, शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की, त्या केवळ स्वतःचंच नाव ओळखत नाहीत तर, ते एकमेकांनाही नावांनी ओळखू शकतात. (सर्व फोटो : प्रतिकात्मक, shutterstock)
या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की मांजरी त्यांच्या नावांसह इतर मांजरींची ठेवलेली नावंही ओळखतात आणि ते त्यांच्या घरातील सदस्यांची नावंही ओळखू शकतात. हे फार विचित्र वाटणार नाही. कारण, कुत्र्यांना शेकडो गोष्टींची नावं लक्षात ठेवण्याचे प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. पण मांजरींचीही ऐकण्याची क्षमताही चांगली असते.
जपानमधील आजुबा विद्यापीठातील प्राणीशास्त्र संशोधक साहो ताकागी यांनी त्यांच्या टीमने जे शोधून काढले ते आश्चर्यकारक असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, “लोकांना सत्य कळावं, अशी माझी इच्छा होती. मांजरासारखे प्राणीही लोकांचं ऐकतात. प्रयोगांमध्ये, टाकगी आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी एकापेक्षा जास्त मांजरींसह घरगुती किंवा इतर वातावरणात राहणाऱ्या मांजरींचा अभ्यास केला. जपानमधील मांजरींच्या कॅफेमध्ये देखील मांजरी एकत्र राहतात. तेथे पर्यटक एकाच वेळी त्यांच्या आसपास असतात.
त्यांच्या प्रयोगात, संशोधकांनी मांजरींना एका संगणकाच्या स्क्रीनवर एक-एक चित्र दाखवलं. त्यांनी ते ओळखलं. त्या ज्या वातावरणात राहात होत्या त्याच वातावरणात राहणाऱ्या मांजरींची ही चित्रं होती. चित्राबरोबरच या वातावरणात असलेल्या मालकाच्या आवाजात मांजरीच्या नावानं (Voice And Face) देखील हाक मारताना ऐकू आलं आणि त्याच वेळी वेगळ्या मांजरीचं नाव देखील हाक मारताना ऐकू आलं. संशोधकांना असं आढळलं की, पाळीव मांजरी संगणकाच्या स्क्रीनकडे टक लावून पाहत जास्त वेळ घालवतात. कारण त्यांना चित्र आणि नाव यात गोंधळ झाल्याचं दिसत होते.
प्रयोगादरम्यान कॅट कॅफेच्या मांजरींनी मात्र, इतर मांजरींना व्यवस्थित ओळखलं नाही. याचं हे देखील कारण असू शकतं की, या मांजरींच्या आसापसच्या वातावरणात मोठ्या संख्येने मांजरी राहतात. म्हणून त्या सर्व मांजरींशी फार परिचयाच्या असत नाहीत. संशोधकांनी त्यांच्या पेपरमध्ये लिहिलं की, फक्त पाळीव मांजरीच एखाद्या विशिष्ट मांजरीचं नाव ऐकल्यानंतर तिचा चेहरा ओळखू शकतात.