

कॅनडाची कंपनी अकसीरा फार्माने कॅनाबिस (cannabis) म्हणजेच भांगेपासून कोरोनाव्हायरसवरील औषध बनवल्याचा दावा केला आहे. कॅनाबिसमध्ये असलेला घटक कॅनाबिडायॉल(Cannabidiol-CBD) चं परीक्षण करून पाहिलं आहे. लॅब-बेस्ड कॅनाबिडायॉलमध्ये कोरोनाव्हायरसच्या उपचारादरम्यान होणारे दुष्परिणाम कमी करण्याची क्षमता आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)


कोरोनाव्हायरसवर उपचार घेत असताना कार्डियाक एरिथमिया (Cardiac arrhythmia) होऊ शकतो, असं काही संशोधनात दिसून आलं आहे. एरिथमियाचं वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हार्ट अटॅकचा धोका उद्भवतो.


कॅनाबिडायॉलपासून तयार केलेल्या औषधात एरिथमोयिसचा धोका कमी करता येऊ शकतो, असा दावा कंपनीने केला.


कंपनीच्या मते, सीबीडीमध्ये नशेसारखे घटक नाहीत. कॅनाबिनोइड्सपासून तयार करण्यात औषधं नव्हर्स सिस्टमसंबंधी आजारांना कमी करू शकतात आणि वेदनांपासून आराम देऊ शकतात, असं कंपनीनं सांगितलं. (फोटो - संग्रहित)


सीबीडीबाबत कंपनीने केलेलं हे संशोधन ब्रिटिश जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या औषधाचं नाव अद्याप ठरलेलं नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे. (फोटो सौजन्य - एपी)