तालिबानी राजवटीमध्ये एवढ्या भयानक निर्बंधामध्ये महिलांना जीवन जगणं अत्यंत असह्य होतं.
|
1/ 14
2001 पूर्वी अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता होती, तेव्हा अफगाणिस्तानमधल्या महिलांना (Afghan women) खूप त्रास सहन करावा लागला होता. पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे (Taliban Rule for woman).
2/ 14
तालिबानने शरिया कायद्यानुसार (Islamic Law) तयार केलेले महिलांसाठीचे नियम आणि कायदे अत्यंत कठोर आणि अमानुष आहेत. या नियमांद्वारे मानवाधिकारांचं (Human Rights) थेट उल्लंघन होतं. त्यातून महिलांचे सर्व अधिकार हिरावून घेतले जातात.
3/ 14
महिलांना कोणत्याही जवळच्या नातेवाईकांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
4/ 14
महिलांना घराबाहेर जाताना नेहमी बुरखा घालावाच लागेल. घट्ट कपडे घातल्यास तिला सार्वजनिक ठिकाणी मारलं जातं.
5/ 14
पुरुषांना महिलांच्या चालण्याचा/पावलांचा आवाज ऐकू येऊ नये. म्हणून महिलांना हाय हिल्स (High Heels) सँडल्स घालता येणार नाहीत.
6/ 14
सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेता येणार नाही.
7/ 14
सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये.
8/ 14
महिलांना घराची बाल्कनी किंवा खिडकीत उभं राहता येणार नाही, जेणेकरून तिथून त्या बाहेरच्या कोणाला दिसता कामा नयेत.
9/ 14
घरामध्ये असणाऱ्या महिलांना कोणी पाहू नये, यासाठी तळमजल्यावर असणाऱ्या घरांच्या खिडक्या पारदर्शक नसाव्यात. त्या रंगवलेल्या असल्या पाहिजेत.
10/ 14
महिलांना त्यांचे फोटो काढता येणार नाहीत. तसंच त्यांचे फोटो वर्तमानपत्र किंवा पुस्तकात छापता येणार नाहीत, घरातही लावता येणार नाहीत.
11/ 14
कोणत्याही ठिकाणाच्या नावात महिला हा शब्द असला, तर तो काढून टाकावा लागणार.
12/ 14
महिलांना नेल पेंट लावता येणार नाही. नेलपेंट लावलं तर बोटं कापली जातात.
13/ 14
तसंच स्वेच्छेने लग्न करता येणार नाही. एखाद्या मुलीने ठरवलेलं लग्न (Arrange Marriage) करण्यास नकार देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास मुलीचं नाक आणि कान कापले जातात.
14/ 14
व्यभिचार किंवा अनैतिक संबंधांसाठी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मारलं जातं.