डास चावल्यानं होऊ शकतो कोरोना? वाचा काय सांगतात डॉक्टर
डास चावल्यानंही कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
|
1/ 7
2/ 7
कोरोना संक्रमित व्यक्तीचं रक्त शोषल्यानंतर जर तोच डास जर निरोगी व्यक्तीला चावला तर त्यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते का यावर आता डॉक्टरांचं स्पष्टीकरण आलं आहे.
3/ 7
न्यू साउथ वेल्स हेल्थ पॅथोलॉजीच्या एका रिपोर्टनुसार संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू केवळ डास चावल्यानं झालेल्या संक्रमणामुळे होतो.
4/ 7
मात्र अद्याप अशी एकही केस समोर आलेली नाही की ज्याच्या आधारावर हा दावा केला जाईल की कोरोना व्हायरस डास चावल्यानं होऊ शकतो.
5/ 7
डॉक्टर कॅमरन वॅब यांनी या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, डास चावल्यानं कोरोना व्हायरस पसरत नाही. हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे. जो शिंका आल्यानं किंवा खोकल्यामार्फत परसतो.
6/ 7
डॉ. कॅमरननी सांगितलं, डास चावल्यानं फक्त डेंग्यू, यलो फिवर, चिकनगुनिया, रोज फिवर आणि जीका व्हायरसचं संक्रमण होतं.
7/ 7
कोरोना व्हायरस व्यतिरिक्त एचआयव्ही आणि इबोला यांचं संक्रमणही डास चावल्यानं होत नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण एकमेकांच्या संपर्कातून होतं.