Side Effects : तुम्हाला हे गंभीर आजार असतील तर चुकूनही खाऊ नका वांगी
वांग्याचं भरीत किंवा भरल्या वांग्याची भाजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं का? पण कधी वांगं खाणं ठरू शकतं धोकादायक. तुमच्यासाठी वांगी खाणं चांगलं की वाईट? पाहा
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीचा त्रास असेल तर तुम्ही वांगी खाणं टाळायला हवं. कारण त्यामुळे समस्या वाढू शकते.
2/ 7
तुम्ही मानसिक तणावात असाल आणि नैराश्याची औषधं (Antidepressants) घेत असाल तर तुम्हाला वांगी खाणं टाळावं लागेल. कारण या औषधांसह वांग्याचं कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतं.
3/ 7
आपल्याला अनेकदा डोळ्यात जळजळ होते आणि जर डोळ्यांचा कुठला विकार असेल तर वांगं पानात नसेल याची काळजी घ्या. कारण त्यामुळे आपल्या डोळ्यांचा विकार आणखी वाढण्याची शक्यता असते.
4/ 7
जर एखाद्या व्यक्तीला मुळव्याधीचा त्रास होत असेल तर वांगी दूरच ठेवावी. कारण या व्याधीसाठी वांगी धोकादायक मानली जातात.
5/ 7
गर्भवती महिलांनी शक्यतो वांगी खाऊ नयेत. गर्भधारणेदरम्यान वांग्याचं सेवन केलं तर वाढत्या गर्भाला धोका असतो, असं म्हणतात.
6/ 7
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही वांगी टाळा. अॅनिमिया ग्रस्त व्यक्तीने वांगं खाल्लं तर रक्ताच्या निर्मितीची प्रक्रिया मंदावते.
7/ 7
Disclaimer: वांगी खावीत की खाऊ नयेत हे तुमच्या प्रकृतीवर असतं. वरील माहिती ही सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. कुठलाही उपाय अवलंबण्याअगोदर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.