जांभूळ हे औषधीय (Medicinal Properties) संपन्न असं एक स्वादिष्ट फळ आहे. जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.
2/ 7
जांभूळ हे फळ मधुमेहींसाठी उत्तम आहे. जांभळाच्या बियांमध्ये दोन प्रमुख बायोयॅक्टिव्ह कंपाउंड्स जम्बोलिन आणि जम्बोसिन असतात. त्यामुळे डायबेटिझ रुग्णांना याचा फायदा होतो.
3/ 7
जांभळाच्या बियांमध्ये एलाजिक अ ॅसिड असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. ते हाय ब्लड प्रेशर आणि त्याच्याशी संबंधित समस्यांना कमी करण्यास मदत करतं
4/ 7
जांभूळ आणि बियांमध्ये फायबर असतं, जे वजन वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय पचनक्रियाही सुरळीत करतं.
5/ 7
जांभूळ त्वचेसाठी फारच उपयोगी आहे. जांभळाची बी चेहऱ्यावरील पिम्पल्स कमी करण्यास मदत करतात.
6/ 7
जांभूळ फळाइतकंच त्याच्या पानांमध्येही फार चांगली तत्त्वे आढळतात. दातांना मजबुती देण्यासाठी त्यांचा फायदा होतो.
7/ 7
जांभळात व्हिटॅमिन सी आणि आयर्न असतं. त्यामुळे ब्लड हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. (सदर माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)