Birthday Poems in Marathi: वाढदिवस हा आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. आपण आपल्या वाढदिवशी आपल्या मित्रांना शुभेच्छा देतो. पण या शुभेच्छा आणखी खास व्हाव्यात यासाठी तुम्ही कवितेतून शुभेच्छा देऊ शकता.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
2/ 5
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
3/ 5
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
4/ 5
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्ने साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे…
5/ 5
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!