Home » photogallery » lifestyle » BHARAT BIOTECH CLAIMS SINGLE DOSE NASAL CORONA VACCINE WILL BE AVAILABLE FROM NEXT YEAR 2 DROPS WILL BE PUT IN THE NOSE MHPL
मेड इन इंडिया कोरोना लशीचे फक्त 2 ड्रॉप करणार कमाल; नाकावाटे घेता येणारी लस तयार
या कोरोना लशीचा (corona vaccine) सिंगल डोसही पुरेसा आहे, असा दावा कंपनीनं केला आहे.
|
1/ 5
कोरोना लस कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आतापर्यंत ज्या कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे, त्या लशी इंजेक्शनमार्फत दिल्या जातील अशा आहेत. मात्र भारतात नाकावाटे घेता येईल अशी लसही तयार केली आहे.
2/ 5
इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकने (BHARAT BIOTECH) तयार केलेली लस पुढील वर्षात उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षात सिंगल डोस लस उपलब्ध होईल असा दावा कंपनीनं केला आहे. या लशीचे फक्त दोन ड्रॉप नाकात टाकले जातील.
3/ 5
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जाईल आणि ज्यांना कोरोनाचा जास्त धोका आहे, त्यांना सर्वात आधी लस दिली जाईल.
4/ 5
यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोरोना महासाथीत महत्त्वाची भूमिका बजावणारे इतर कोरोना वॉरिअर्सचाही समावेश असेल. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक आणि इतर आजार असलेले लोक, वयस्कर व्यक्ती यांचाही समावेश असेल.
5/ 5
दरम्यान लस आल्यानंतरही कोरोनाची महासाथ थांबणार नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अधानोम घेब्रियेसिस यांनी सांगितलं, फक्त लस कोरोना महासाथीला थांबवू शकत नाही.