जेव्हा बाईक ट्रिपचा विषय येतो तेव्हा लेहचा उल्लेख झाला नाही, असं होऊ शकत नाही. दिल्ली ते लेह बाईक ट्रिप (Delhi to Leh Bike trip) बाइकर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. हा प्रवास धोकादायक मार्गांनी भरलेला आहे. त्यामुळे इथे बाईक चालवणं हे एक प्रकारचं साहसदेखील आहे. दिल्ली ते लेह हा मोटरसायकल प्रवास किमान 15 दिवसांचा आहे. वाटेत तुम्ही अनेक अविस्मरणीय अनुभव घेऊ ठेवता, हीच या ठिकाणची खासियत आहे.
सुंदर मैदानं आणि दऱ्याखोऱ्यांमधून जाणार्या या रस्त्यांमध्ये तुम्हाला कुठेतरी हरवल्यासारखे वाटेल. शिमला ते स्पिती व्हॅली बाईकने प्रवास (Shimla to Spiti Valley Bike Ride) करणे हा खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक सुंदर पर्यटन स्थळं, शिमल्याची हिरवाई आणि स्पितीकडे पाहणाऱ्या बर्फाच्या माळा स्वर्गापेक्षा कमी नाहीत. बाईकवरून जाताना धबधबे, नद्या, मेंढ्यांचे कळप इत्यादींचं सुंदर दृश्य जवळून अनुभवता येतं.
तुम्ही बंगळुरूमध्ये किंवा आसपास राहत असाल, तर बंगळुरू ते कन्नूर रोड ट्रिप (Bangalore to Kannur road trip) तुमच्यासाठी जबरदस्त ठरू शकते. बंगळुरूच्या शहरी भागातून केरळमधील कन्नूरपर्यंतचा प्रवास तुम्हाला खूपच भुरळ घालेल. वाटेत सुंदर तलाव आणि धबधबे आहेत आणि तुम्ही पर्वतांच्या मधोमध असलेल्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आनंद देखील घेऊ शकता.
तुम्हाला भारताच्या ईशान्येकडील राज्यांचं सौंदर्य पाहायचे असेल, तर तुम्ही भालुकपोंग ते तवांगपर्यंत दुचाकीने प्रवास (Travel by bike from Bhalukpong to Tawang) करू शकता. अरुणाचल प्रदेशातील भालुकपोंग ते तवांग दरम्यानचा रस्ता बाइकिंगसाठी योग्य आहे. येथे तुम्हाला निसर्गाचे विहंगम देखावे पाहायला मिळतात आणि आजूबाजूला सौंदर्य दिसतं.
जर तुम्ही राजस्थानला गेलात, तर तुम्हाला जयपूर ते जैसलमेर (Jaipur to Jaisalmer Bike trip) बाइकने प्रवास नक्की करा. जयपूर ते जैसलमेरपर्यंत तुम्हाला भव्य आणि ऐतिहासिक किल्ले दिसतील. 557 किमीचा रस्ता प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 12 तास लागतात. परंतु, हे अंतर बाइकने कापणे हा एक संस्मरणीय अनुभव आहे.