

तुमचं लग्न जर होत आहे आणि तुम्ही जानेवारीमध्ये हनीमूनचं प्लॅनिंग करत आहात तर या ५ जागांचा तुम्ही नक्की विचार करु शकता.


भारतातील हनीमून डेस्टिनेशमध्ये सर्वात वरच नाव आहे ते काश्मीर. काश्मीरला पृथ्वीवरचं नंदनवन म्हटलं जातं. इथल्या निसर्ग सौंदर्याचं जेवढं कौतुक करु तेवढं कमीच आहे. डिसेंबर महिन्यात काश्मीरवर बर्फाची चादर पांघरलेली असते. सुंदर झाडं, फुलं यांच्या सानिध्यात दिवस कसे संपतात तेच कळत नाही.


यात दुसरं नाव आहे ते केरळ. पर्वत रांगा असो किंवा घनदाट जंगल. केरळमध्ये तुम्हाला सगळच पाहायला मिळेल. देवभूमी केरळमधलं आल्हाद वातावरण लोकांना इथे सारखं यायला उद्युक्त करतं. हनीमूनमध्ये एकमेकांना जास्त समजून घेण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणाची निवड करायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.


तुम्हाला उत्साहाने पूर्ण वातावरण हवं असेल तर गोवा तुमचीच वाट पाहत आहे. समुद्र, हिरवळ आणि थंडी हे कॉम्बिनेशन हनिमूनसाठी अगदी योग्य आहे. बीच किनारी तुम्ही पार्टीची मजा लुटू शकता. तसंच क्लबमध्ये जाऊनही पार्टी करु शकता.


राजस्थान हाही एक सुंदर पर्याय तुमच्यासमोर आहे. राजस्थान फार मोठं असल्यामुळे तुम्ही उदयपुर हा पर्याय नक्कीच निवडू शकता. इथल्या महाल आणि तलावामध्ये तुमचं हनीमून फार राजेशाही थाटात आणि अविस्मरणीय होईल यात काही वाद नाही.