ऑफिसमध्ये काम करू नका फक्त 9 तास झोपा; भारतीय कंपनी तु्म्हाला देणार एक लाख रुपये पगार
ऑफिसमध्ये साधी डुलकी जरी घेतली तरी तुमची नोकरी जाण्याचा धोका असतो. मात्र इथं तर तुम्हाला झोपण्यासाठी पगार दिला जाणार आहे.
|
1/ 13
रात्री झोप पूर्ण झाली नाही आणि ऑफिसमध्ये डुलकी लागली की ऑफिसमध्ये झोपायला येता का? असा बॉसचा ओरडा पडतोच. मात्र भारतातील एक कंपनी तुम्हाला ऑफिसमध्ये झोपण्यासाठीच पगार देणार आहे.
2/ 13
भारतातील एका कंपनीने स्लिप इंटर्नशीप सुरू केली आहे, म्हणजे तुम्हाला कामासाठी नव्हे तर फक्त झोपण्यासाठी स्टायपेंड दिला जाणार आहे.
3/ 13
ऑफिसमध्ये रात्री नऊ तास झोपण्यासाठी तुम्हाला तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे.
4/ 13
एक लाख रुपये स्टायपेंडसह झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी इंटर्न्सना स्लिप एक्सपर्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ, इंटेरिअर डिझायनर यांचं मार्गदर्शनही ही कंपनी उपलब्ध करून देणार.
5/ 13
प्रत्येक नोकरीसाठी काही अटी आणि पात्रता असतात. तशा या इंटर्नशीपसाठीदेखील आहेत.
6/ 13
या इंटर्नशीपसाठी तुमच्याकडे कोणतीही डिग्री असली तरी हरकत नाही. जर तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये झोपला असाल तर त्याचा अतिरिक्त बोनस असेल.
7/ 13
तुम्हाला बेडवर गेल्यानंतर 10 ते 20 मिनिटांत झोपावं लागेल.
8/ 13
आवाज असलेल्या ठिकाणीदेखील तुम्हाला झोप लागायला हवी.
9/ 13
संबंधित व्यक्तीने लक्ष केंद्रीत करून आपल्या झोपेच्या पद्धतीचं शिस्तबद्ध रेकॉर्ड करायला हवा.
10/ 13
ज्यांनी Chamomile (एक औषधी फुल) याची चव घेतली असेल, ज्यांनी आपल्या सोशल मीडियावर कमी वेळ घालवला असेल, तसंच ज्यांना वेबसाईटवरील लेख वाचण्यात कमी स्वारस्य असणे आणि त्यांना झोपण्यात जास्त मन लागणे. अशा व्यक्तींना प्राध्यान्य दिलं जाईल.
11/ 13
तुम्ही या अटी पूर्ण करत असाल आणि या इंटर्नशिपसाठी पात्र आहात तर मग फक्त झोपण्यासाठी एक लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल.
12/ 13
आता तुम्ही म्हणाल ही कंपनी नेमकी आहे कोणती? तर बंगळुरूतील वेकफिट (Wakefit) कंपनीने अशी स्लिप इंटर्नशीप सुरू केली आहे.
13/ 13
या कंपनीने पहिल्यांदाच स्लिपिंग इटर्नसाठी वॅकन्सी काढल्या नाहीत. याआधीदेखील जवळपास 1.7 लाख लोकांनी या इंटर्नशीपसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त 23 जणांची निवड झाली होती. त्यामध्ये 21 भारतीय आणि दोन परदेशी नागरिक होते.