पिंपळाच्या पानांचे आरोग्य फायदे माहितीये? पोटापासून त्वचेच्या समस्यांसाठी असा करा वापर
आपल्या देशात असंख्य पवित्र वनस्पती आणि झाडे आहेत. त्यापैकीच एक आहे पिंपळाचे झाड. या झाडाला पवित्र वृक्ष मानले जाते. त्याचबरोबर याचे अनेक आरोग्य फायदेदेखील आहेत.
पिंपळाच्या झाडाची पाने बद्धकोष्ठता, अतिसार आणि रक्ताशी संबंधित समस्या दूर करतात. कारण पिंपळाच्या पानांमध्ये ग्लुकोज, ऑस्टियोरिड, फिनोलिक असे गुणधर्म असतात.
2/ 8
पिंपळाच्या झाडाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या झाडाचा उपयोग विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. या झाडाची पाने, साल, देठ, बिया, फळे यांचा औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो.
3/ 8
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म खोकला दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. म्हणून पिंपळाच्या पानांचा रस करून प्यावा. याने श्लेष्माची समस्या देखील दूर होते.
4/ 8
पिंपळाच्या पानांचा रस फुफ्फुसांना डिटॉक्स करण्याचे काम करतो. हा रस प्यायल्याने फुफ्फुसातील जळजळ कमी होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.
5/ 8
पिंपळाच्या पानांचा रस डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करतो. यामुळे रक्त शुद्ध होते. रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे त्वचेच्या समस्या जसे की, चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग देखील दूर होतात.
6/ 8
पिंपळाच्या पानांचा ज्यूस तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते. पिंपळाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म स्पाइक नियंत्रित करतात आणि साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात.
7/ 8
पिपळाच्या पानांचा रस दात आणि हिरड्यांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हिरड्यांच्या त्रासातही आराम मिळतो.
8/ 8
पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते. डायरियासोबत मळमळण्याची समस्या असेल तरीही हा रस खूप फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता या समस्याही दूर होतात.