केस मजबूत होण्यासाठी चहा पावडरचं पाणी वापरता येतं,यामुळे केसांना नैसर्गिक चमक आणि काळा रंग येतो.
2/ 7
चहा पावडरच्या पाण्यामुळे आपले केस चांगले वाढतात. याशिवाय रेशमी आणि मुलायम बनतात.या पाण्याने केस धुतल्यामुळे केसांचं गळणं, तुटणार बंद होतं.
3/ 7
चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे यातील पॉलिफिनॉलमुळे केसांचं इन्फेक्शन कमी होतं. इन्फेक्शनमुळे केसांवरील त्वचा निघत असेल तर त्रास कमी होतो.
4/ 7
केसांमध्ये कोंडा झाला असेल तर, चहा पावडरच्या पाण्याने फायदा मिळतो. चहा पावडरचं पाणी केसांसाठी वापरलं तर केसांची वाढ होते. केस मजबूत बनतात.
5/ 7
चहा पावडरच पाणी या पद्धतीने तयार करा.1 लिटर पाण्यामध्ये फक्त 2 चमचे चहा पावडर टाका. त्यानंतर 7 ते 8 मिनिटं गॅसवर चांगलं उकळून द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर केसांसाठी वापरता येतं.
6/ 7
केस शाम्पूने स्वच्छ धुवा. त्यानंतर चहापावडरचं पाणी केसांवर टाका केस पूर्ण भिजू द्या. पाणी केसांवर टाकल्यावर 1 मिनिटं हाताने केसांना मसाज करा. यानंतर केसांना टॉवेल बांधा.आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करता येतो.
7/ 7
हेअर कलर- 1 मग पाण्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालून हे पाणी उकळून अर्ध करा. थंड झाल्यावर हे पाणी कलर ब्रशने केसांना लावा. त्यानंतर एक तास केस वाळू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केला तर केस काळे होतात.