शास्त्रज्ञांनी ड्यूरियनची (Durian) साल वाळवली, त्यात ग्लिसरॉल टाकून त्याचे गुळगुळीत आणि मऊ हायड्रोजेलमध्ये रूपांतर केले. एनटीयूमधील (NTU) अन्न आणि विज्ञान कार्यक्रमाचे संचालक प्रा.विलियम चेन यांच्या मते, सिंगापूर दरवर्षी सुमारे 12 दशलक्ष ड्यूरियन वापरतो. ज्यामध्ये साल आणि बियाणे लगदा खाल्ल्यानंतर वाया जातात.