या 6 सवयींमुळे हाडे होतात लाकडासारखी कमकुवत, फ्रॅक्चरचा धोकाही अनेक पटींनी वाढतो
दीर्घायुष्य जगायचे असेल तर त्यासाठी शरीर निरोगी ठेवायला हवे. शरीर तेव्हाच तंदुरुस्त राहते जेव्हा आपण शरीराला आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे पूर्णपणे पुरवू. मात्र आपल्या काही सवयींमुळे आपल्या हाडांचे आणि परिणामी शरीराचे नुकसान होते.
आपली हाडे देखील आपल्या आरोग्यामध्ये मोठी भूमिका बजावतात. हाडे फक्त आपल्या शरीराचा समतोल राखतात आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावर आपण धावतो आणि चालतो. मात्र अनेक वेळा आपल्या वाईट सवयींमुळे आपली हाडे कमकुवत होतात.
2/ 8
त्यामुळे त्यांची हाडे तुटण्याचा आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. दैनंदिन जीवनातील आपल्या काही सवयींमुळे आपल्या हाडांचे नुकसान होते. पाहुयात त्या सवयी कोणत्या आहेत.
3/ 8
कॉफी/चहाचे अतिसेवन : जर तुम्ही कॉफी किंवा चहाचे जास्त सेवन करत असाल. तर तुमची हाडे हळूहळू कमकुवत होऊ शकतात. चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये कॅफिन आढळते आणि ते शारीरिक आरोग्यासाठी तसेच हाडांसाठी हानिकारक आहे.
4/ 8
दारूचे अतिसेवन : दारूचे सेवन आरोग्यासाठी शत्रूसारखे आहे. जर तुम्ही जास्त दारू प्यायले तर त्यामुळे तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. मद्यपान केल्याने, हाडे कॅल्शियम शोषण्याची क्षमता गमावतात. त्यामुळे तुम्ही दारूचे सेवन करत असाल तर आजच बंद करा.
5/ 8
मिठाचे अतिसेवन : बरेच लोक जेवणात जास्त मीठ घेतात, परंतु त्यांच्या या सवयीमुळे त्यांची हाडे कमजोर होतात. जास्त मीठ खाल्ल्याने कॅल्शियम लघवीद्वारे बाहेर पडते आणि हाडे कमकुवत होऊ लागतात.
6/ 8
शीतपेयांचे अतिसेवन : उन्हाळ्यात शीतपेयांचे जास्त सेवन केले जाते. थंडीच्या वातावरणातही शीतपेयांचे सेवन करणारे अनेक जण आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की शीतपेय प्यायल्याने हाडे कमकुवत होतात.
7/ 8
डाएटिंग : अनेकदा लोकांना वाटतं की आपण कमी खाल्लं किंवा डायटिंग केलं तर वजन कमी होईल आणि फिटनेस चांगली राहील. डाएटिंग नेहमी आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावी. दीर्घकाळ डाएटिंग केल्याने शरीर आणि हाडे दोन्ही कमकुवत होऊ लागतात.
8/ 8
कमी शारीरिक हालचाल : तुम्ही एकाच ठिकाणी बसून काम करत असाल. शारीरिक हालचाल नगण्य असेल तर तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो, ज्यामुळे हाडे तुटण्याचा आणि फ्रॅक्चरचा धोका असतो.