

लांबच्या प्रवासाला जाताना आपण नेहमीच आपल्यासोबत घरून डबा करून नेतो किंवा वाटेत मिळणारे चमचमीत पदार्थ खातो. पण प्रवासात कोणते पदार्थ खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


तळलेले पदार्थ- प्रवासात सामोसे, बटाटा वडा, छोले भटूरे यांसारखे तळलेले पदार्थ खाणं टाळा. यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा तळलेले पदार्थ विकायला येतात. भूकेमुळे आपण ते पदार्थ विकतही घेतो आणि खातो. उघड्यावर तळलेले पदार्थ खालल्यामुळे प्रवासात तब्येत बिघडू शकते.


मांसाहार- प्रवासात मांसाहार खाणंही टाळाच. कारण हे जेवण कोणत्या तेलात आणि मसाल्यांमध्ये तयार केलं जातं हे माहीत नसतं. प्रवासात शक्यतो हलके- फुलके पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या.


दूध आणि अंड- प्रवासात अनेकदा ऑमलेट आणि दूध खरेदी करतो. पुढच्या वेळेस प्रवासात जाताना या दोन गोष्टी घेऊन जाऊ नका. या दोन्ही गोष्टी पटकन पचत नाहीत.