OMG! बर्फाच्या बॉक्समध्ये सर्वाधिक वेळ राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड; फक्त PHOTO पाहूनच अंगावर येईल काटा
बर्फाचा एक (ice cube) तुकडा जरी आपण हातात घेतला तरी तो काही सेकंदही आपल्याला धरवत नाही. मात्र ही व्यक्ती कपडे न घालता कित्येक तास बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये (ice filled box उभी राहिली आहे.


ऑस्ट्रेलियातील एक व्यक्ती Austrian man अंगावर फक्त स्विम ट्रन्क्स घालून दोन तासांपेक्षाही अधिक वेळ बर्फाने भरलेल्या एका बॉक्समध्ये उभी राहिली आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


जोसेफ कोएबर्ल असं या व्यक्तीचं नाव आहे. जोसेफने आपलाच आधीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. बर्फाने भरलेल्या काचेच्या बॉक्समध्ये तो तब्बल 2 तास 30 मिनिटं 57 सेकंद राहिला आहे. (फोटो सौजन्य - एपी)


त्याच्या खांद्यापर्यंत बर्फाचे तुकडे होते. जवळपास 200 किलोपेक्षा अधिक हा बर्फ होता. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


जोसेफने फक्त स्विम ट्रन्क्स घातलं होतं. बाकी त्याच्या शरीरावर कोणतेच कपडे नव्हते. त्याने आपले दोन्ही हात छातीजवळ धरले होते. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


बर्फात असताना शरीराला होणाऱ्या वेदनांवर मात करण्यासाठी तो सकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्यानं सांगितलं. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)