ATM मधील ग्रीन सिग्नल महत्त्वाचा; नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं
ATM मध्ये पैसे काढायला गेल्यानंतर तुमच्या या छोट्याशा कामामुळे तुमचे पैसे बँक खात्यात सुरक्षित राहतील.
|
1/ 6
नागरिकांचे पैसे बँकेत सुरक्षित राहावेत यासाठी आरबीआय अनेक पावलं उचलत आहेत. नुकतेच आरबीआयने डेबिट आणि क्रेडिच कार्डसंबंधी नियम बदलले आहेत. मात्र यापेक्षा तुम्ही अधिक सावध राहणं गरजेचं आहे. एटीएममध्ये गेल्यानंतर तुमची एक छोटीशी चूक चांगलीच महागात पडेल.
2/ 6
एटीएममध्ये गेल्यानंतर एटीएमचा कार्ड स्लॉट नीट पाहा. जर तुम्हाला त्यात काही गडबड वाटत असेल तर तुम्ही ते कार्ड स्लॉट वापरू नका.
3/ 6
कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्यातील लाइटवर लक्ष ठेवा. जर ग्रीन लाइट असेल तर तुमचं एटीएम सुरक्षित आहे. मात्र त्यामध्ये लाल लाइट असेल किंवा कोणतीच लाइट नसेल तर एटीएमचा वापर करून नका. या एटीएममध्ये गडबड असू शकते.
4/ 6
एटीएम कार्ड स्लॉटमार्फत हॅकर्स युझर्सचा डेटा चोरू शकतात. एटीएम मशीनमध्ये असं डिव्हाइस लावतात, ज्यामुळे तुमच्या कार्डवरील संपूर्ण माहिती ते स्कॅन करू शकतात. त्यानंतर ब्लूटूथ किंवा दुसऱ्या वायरलेस डिव्हाइसमार्फत तुमचा डेटा चोरू शकतात आणि बँक अकाऊंट रिकामं करू शकतात.
5/ 6
जर तुम्हाला वाटलं की तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकलात आणि बँक बंद आहे. तर लगेच पोलिसांना संपर्क करा. तुम्हाला हॅकर्सचे फिंगरप्रिंट मिळतील, तसंच तुमच्या जवळपास कुणाचं ब्लूटूथ कनेक्शन काम करत आहे, ते समजेल, ज्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचचा येईल.
6/ 6
तुमच्या डेबिट कार्डचा वापर करण्यासाठी हॅकर्सकडे तुमचा पिन नंबर असायला हवा. हा पिन नंबर तो कॅमेऱ्यामार्फत ट्रॅक करू शकतो. त्यामुळे एटीएममध्ये पिन नंबर टाकताना दुसरा हात त्यावर झातून घ्या. जेणेकरून सीसीटीटीव्ही कॅमेऱ्यात तुमचा पिन नंबर दिसणार नाही.