मेष रास - मेष राशीच्या मुली साहसी, निडर आणि धैर्यवान असतात. त्या आपल्या करीयरच्या बाबतीत कोणतंच कॉम्प्रोमाईज करत नाहीत. त्यांच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे लोकांवर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळतो. मेष राशीच्या मुली स्वतःच्या हिमतीवर ती करिअर घडवतात.
तुळ रास - तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र आणि शनी यांच्यामध्ये मैत्री आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार तुळ राशी वर शनी देवाची चांगली कृपा असते. शुक्र आणि शनीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना सगळी सुखं मिळतात. या राशीच्या मुली अतिशय मेहनती आणि ईमानर असतात. त्यामुळेच आयुष्यामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करतात.
धनु राशी - धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु अतिशय शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहाच्या प्रभावामुळे धन आणि संपत्तीची प्राप्ती होते. धनु राशीवर ग्रहांची विशेष कृपा असल्यामुळे या राशीचे लोक भाग्यवान मानले जातात. हे लोक जे काम हातात घेतात त्यात त्यांना यश मिळतं. या राशीच्या मुली अतिशय नशिबवान असतात. त्यांना सासरी कशाचीच कमी भासत नाही.
कुंभ रास - कुंभ राशीच्या मुली चतुर आणि बुद्धिमान असतात. त्या शिस्तप्रिय आणि गंभीर स्वभावाच्या असतात. त्यांना आपला सन्मान सर्वात जास्त प्रिय असतो. कोणाचे उपकार घ्यायला त्यांना आवडत नाही. समाजामध्ये चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा असते. या मुलींनी करिअर घडवण्याचा निश्चय केला तर त्या आपलं ध्येय गाठतातच.