

एका विवाह सोहळ्यादरम्यान भलताच प्रकार घडला. येथे एक माणूस सहा गर्भवती महिलांना घेऊन आला. यानंतर त्याने जो दावा केला आहे, ते ऐकून अनेकांना धक्काच बसला. या सहा गर्भवती महिलांच्या गर्भतील बाळांचा बाप असल्याचे त्याने सांगितले. प्रेटी माइक नावाच्या या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.


प्रीती माईक नायजेरियातील रहिवासी आहे आणि प्लेबॉय म्हणून प्रसिद्ध आहे. यापूर्वीही तो बर्याचदा चर्चेत आला आहे. 2017 मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यासाठीही त्याला अटक करण्यात आली होती.


प्रीटी माईक आपल्या अभिनेता मित्र विलिअम्स उचेम्बाच्या लग्नात सहा गर्भवती महिलांसोबत पोहोचला होता. याकारणाने वर-वधूपेक्षा अधिक चर्चा माइकची झाली.


प्रीटी माईकने सोशल मीडियावर लिहिले आहे की तो आपले सर्वोत्तम आयुष्य जगत आहेत आणि ही काही अभिनयाची ट्रिक नाही. बर्याच जणांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की लग्नात सर्वजण त्याच्याविषयी चर्चा करीत असल्याने वधू-वराच्या मजेत व्यत्यय आला.