

तुम्ही कोबीची भाजी खात असालच. तर जरा थांबा आणि ही बातमी नीट वाचा. कोबीमध्ये किडे असतात आणि ते तुमच्या डोक्यात घुसतात. त्यामुळे हजारो लोकांनी कोबी खाणं सोडून दिलं आहे. आता तो कोणता किडा आहे आणि डोक्यात कसा शिरतो जाणून घेऊयात...


कोबीला इंग्रजीमध्ये CABBAGE म्हणतात आणि फ्लॉवरला cauliflower असं म्हणतात. पण कोबी आणि फ्लॉवर एकाच प्रजातीच्या भाज्या आहेत. कोबीतून निघणाऱ्या किड्यांना टेपवर्म (tapeworm)म्हणजेच लांब जंत असं म्हणतात. पावसाळ्यात कोबीमध्ये या किड्यांचं प्रमाण जास्त असतं.


टेपवर्म किडा आंतड्यांमध्ये गेल्यानंतर रक्त प्रवाहासोबतच शरीराच्या इतर भागांमध्ये आणि मेंदूमध्ये पोहोचतो. हा किडा खूपच लहान असतो, जो आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामुळे भाज्या उकळत्या पाण्यात धुतल्या किंवा त्या निट शिजवल्या तर त्यातले जंतू मरून जातात.


टेपवर्म पावसाच्या पाण्यातून किंवा इतर प्रवाहातून जमिनीत जातात. त्यामुळे हे किडे कच्च्या भाज्यांमध्ये शिरतात. हे किडे पोटात गेल्यानंतर सगळ्यात आधी आतडे, त्यानंतर रक्त प्रवाह आणि नंतर नसांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचतात. हे किडे मेंदूला जखम करतात.


टेपवर्म या किड्यापासून होणाऱ्या इन्फेक्शनला टॅनिएसिस (taeniasis)असं म्हणतात. बरं इतकंच नाही तर हे किडे शरीरात गेल्यानंतर अंडी देतात. या किड्यांच्या 3 प्रजाती आहेत. (1) टीनिया सेगीनाटा, (2) टीनिया सोलिअम आणि (3) टीनिया एशियाटिका


हे किडे यकृतामध्ये गेल्यानंतर सिस्ट तयार करतात. या किड्यांमुळे डोळे निकामी होण्याचीही शक्यता आहे.


हे किडे आपल्या पोटातील आहारालाही आपलं भोजन बनवतात. हे किडे ज्या व्यक्तीच्या डोक्यात शिरतात त्या व्यक्तीला झटके येऊ लागतात. सुरुवातीला याची लक्षणं दिसून येत नाहीत पण नंतर त्याचा खूप त्रास जाणवतो.


असं म्हटलं जातं की, डोक्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवली की मेंदूच्या आतील संतुलन बिघडतं. एका टेपवर्मची लांबी 3.5 ते 25 मीटर असते.


ज्या पदार्थांमध्ये टेपवर्मसारखे किडे आढळतात तसे पदार्थ खाणं टाळा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. भारतात तब्बल 12 लाख लोक न्यरोसिस्टिसेरसोसिसने पीडित आहेत.