जयपुर- अंतर (दिल्लीपासून) जवळपास 300 किमी बस- 250 रुपये तिकीट ट्रेन- 150 रुपयांपासून सुरू. मुंबई ते दिल्ली ट्रेनचा प्रवासही फार महाग नाही. जयपूरमध्ये 500 रुपये दिवसाप्रमाणे अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. तसेच छोट्या हॉटेलमध्ये एका व्यक्तिचा जेवणाचा खर्च 100 ते 200 रुपयांमध्ये होतो. इथे फिरण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकता. हा खर्च ही 200 ते 300 रुपयांपर्यंत होईल. इथे अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जी दिवसभर तुम्ही पाहू शकता.
कसोल- अंतर- (दिल्लीवरून) साधारण 517 किमी बस- तिकीट 500 रुपयांपासून सुरू ट्रेन- 500 रुपयांपासून सुरू इथे मोठ्या रेस्तरांपासून ते छोटेखाली हॉटेलपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. मणिकरणपासून कसोलचे अंतर फक्त 5 किमी आहे. इथे तुम्हाला परदेशी पर्यटकही फिरताना दिसतील. इथे तुम्हाला प्रती दिन 500 रुपये प्रमाणे हॉटेल उपलब्ध होतील. इथे तुम्ही ऑनलाइन बुकिंगही करू शकता. गोंधळापासून दूर तुम्ही इथे काही दिवस सहज राहू शकता.
ऋषिकेश- अंतर- (दिल्लीपासून) जवळपास 254 किमी बस- 200 रुपयांपासून सुरू ट्रेन- 55 रुपयांपासून सुरू ऋषिकेश रिवर राफ्टिंगसाठी फार प्रसिद्ध आहे. 2 ते 3 हजार रुपयांमध्ये स्थानिक कंपन्या तुम्हाला पॅकेज देतात. यात खाणं- पिणं ही असतं. जर तुम्ही टूर पॅकेजशिवाय जात असाल तुम्ही याहून कमी किंमतीत फिरू शकता. दिल्लीपासून ऋषिकेशपर्यंतचा प्रवास 200 रुपयांपासून सुरू होतो. नदी किनारी टेंट हाऊस हवे असेल तर त्याचे प्रती रात्र 500 ते 1000 रुपये खर्च होतो.
लेन्स डाउन, उत्तराखंड अंतर- (दिल्लीपासून) जवळपास 250 किमी बस- 1000 रुपयांपेक्षाही कमी तुम्ही कोटद्वारपर्यंत पोहचल्यावर सार्वजनिक वाहनांच्या सहाय्याने लेन्स डाउनला जाऊ शकता. कोटद्वार ते लेन्स डाउनपर्यंतचं अंतर 50 किमी आहे. दिल्लीपासून कोटद्वारपर्यंत रस्ता तसेच रेल्वेच्या मार्गाने जाता येतं. दिल्ली ते लेन्स डाउनपर्यंत तुम्ही 1 हजार रुपयांपेक्षाही कमी रुपयांत जाऊ शकता. 700 ते 800 रुपयांपर्यंत तुम्हाला हॉटेल मिळेल.
धर्मशाला- अंतर- (दिल्लीपासून)- जवळपास 475 किमी बस- 500 रुपयांपासून सुरू ट्रेन- 500 रुपयांपासून सुरू इथले सर्वात चांगली हॉटेल्सही प्रती रात्र 1 हजार रुपयांच्या आतच्या दरात मिळतील. बर्फाच्या पर्वतरांगा आणि नयनरम्य दृश्य तुम्हाला तिथे काही दिवस राहण्यासाठी नक्कीच परावृत्त करतील. 10 किमी दूर असलेले मॅकलोडगंज हा परिसरही फिरण्यासारखा आहे. इथे बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांचे खूप सुंदर मंदिर आहे.