Home » photogallery » lifestyle » AFRAID TO GET BALD AT AN EARLY AGE TAKE THESE 5 THINGS IN YOUR DAILY DIET FROM TODAY RP

कमी वयातच टक्कल पडण्याची भीती वाटतेय? रोजच्या आहारात आजपासूनच घ्या या 5 गोष्टी

वाढत्या वयासोबत केस गळण्याची समस्या ही नवीन गोष्ट नाही, पण आता तरुणांनाही कमी वयात अशा समस्यांना सामोरे जावं लागत आहे. जर तुमचे केस जास्त गळत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण टक्कल पडण्याची ही पहिली स्टेप आहे. यासाठी तुम्ही शाम्पू किंवा केसांचे तेल बदलले तर केसगळतीपासून सुटका मिळेल, असे होत नाही. यासाठी योग्य आहार घेणंही आवश्यक आहे. केस जास्त गळत असतील तर लगेच तुमच्या जीवनशैलीत सुधारणा करा. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने असे काही पदार्थ खा, ज्यातून तुमच्या केसांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. यासाठी तुम्हाला 5 वनस्पती आधारित पदार्थ खावे लागतील ज्यामध्ये विविध पोषक तत्वे उपलब्ध असतील.

  • |