

आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या आपल्या हाय प्रोफाईल राहणीमानामुळे चांगलीच चर्चेत आली आहे (Photo-Instagram/ Monalisa)


मोनालिसा नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. (Photo-Instagram/ Monalisa)


मोनालिसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीच खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.मात्र ती टीव्ही जगतात मोनालिसा याच नावाने ओळखली जाते. (Photo-Instagram/ Monalisa)


मोनालिसा ही मूळची कोलकात्याची असून तिने भोजपुरी, तामिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि हिंदी या भाषांतील चित्रपटांत अभिनय केला आहे. (Photo-Instagram/ Monalisa)


कलर्स वाहिनीवरील बिग बॉस शोमध्येदेखील तिने सहभाग घेतला होता. यामध्ये ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली होती. (Photo-Instagram/ Monalisa)


भोजपुरी अभिनेता आणि तिच्यासोबत बिग बॉसचा स्पर्धक असलेला विक्रांत सिंह राजपूत याच्यासोबत तिनं लग्न केलं आहे. (Photo-Instagram/ Monalisa)


बिग बॉसनंतर मोनालिसाला छोट्या पडद्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. स्टार प्लस वरील 'डायन ' या मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत दिसून आली. (Photo-Instagram/ Monalisa)


मोनालिसाला अभिनयासोबतच नृत्य आणि फोटोग्राफीचीही आवड आहे. अनेक कार्यक्रमात ती आपल्या नृत्याचा जलवा दाखवताना दिसून आली आहे. (Photo-Instagram/ Monalisa)


मोनालिसा ही भोजपुरी चित्रपटात सर्वात जास्त रक्कम घेणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. भोजपुरीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिला गणलं जातं.(Photo-Instagram/ Monalisa)


मालिकेमधील एका दिवसाच्या शूटसाठी ती तब्बल 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारते आणि एका भोजपुरी चित्रपटासाठी 5 ते 7 लाख रुपये घेते.(Photo-Instagram/ Monalisa)