आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. या नीति कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.
2/ 11
चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.
3/ 11
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत.
4/ 11
आचार्य चाणक्य सांगतात की सकाळची वेळ बहुमुल्य असते. त्यामुळे प्रत्येत व्यक्तीने लवकर उठावं.
5/ 11
ज्यांना वेळेच महत्व कळत नाही असे लोक लवकर उठत नाहीत अणि उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडतात. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नाही. असे लोक नेहमी दरिद्री राहतात.
6/ 11
शरीराच्या स्वच्छतेबरोबर दात आणि कपड्यांची साफसफाई करणं देखील खूप महत्वाचं आहे. जे नियमितपणे आंघोळ करत नाहीत,दात स्वच्छ करत नाहीत आणि अस्वच्छ कपडे घालतात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही.
7/ 11
अशा लोकांचं आयुष्य आजारपणात जातं. त्यांतच त्यांचे बरेच पैसे वाया जातात.
8/ 11
चाणक्य यांनी जेवणाला खुप महत्वाचं मानलं आहे. सदृढ शरीरासाठी प्रत्येकाने वेळेवर जेवण करावं असं ते म्हणतात. जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे,पण खाण्यासाठी जगू नका असंही ते सांगतात.
9/ 11
ज्या लोकांचं मन खाणं आणि पैसे यात गुंतलेलं असतं त्यांच्या घरात पैसा टिकू शकत नाही.
10/ 11
आचार्यंच्यामते जगातील सगळी मोठी कामं गोड शब्दांनी होतात. गोड बोलणारे लोक सर्वांना प्रिय असतात. त्यांना सगळीकेड आदर मिळतो, संधी उपलब्ध होतात.
11/ 11
त्याउलट कडू बोलणारे कोणालाच आवडत नाहीत. त्यांचे संबंध चांगले राहत नाहीत. लक्ष्मी त्यांच्या जवळ कधीच थांबत नाही.