वृषभ,मिथुन कन्या,तुळ, मकर आणि कुंभ लग्न राशीच्या लोकांना पुष्पराज न घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार पुष्कराज बरोबर नीलम, हिरा, गोमेद हे रत्न देखील घातले पाहिजेत. ज्यांच्या पत्रिकेत गुरु ग्रह सहाव्या,आठव्या किंवा बाराव्या स्थानामध्ये विराजमान असतात. त्यांनी पुष्कराज धारण करू नये.
पाचू रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीचं भाग्य पालटतं. विद्यार्थ्यांसाठी हे रत्न अतिशय फलदायी मानले जातं. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पाचू रत्न फलदायी ठरतं. याशिवाय वृषभ,तुला,मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांनी देखील हे रत्न धारण करावं. मात्र मेष,कर्क,वृश्चिक या राशीच्या लोकांनी पाचू रत्न धारण करू नये.