

अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) मेहुल पैसोबत (Mehul Pai) विवाह बंधनात अडकली आहे. जवळच्याच लोकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीचा तिचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान आता तिच्या लग्नाच्या रिसेप्शनचेही फोटो तिनं स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


या फोटोत अभिज्ञानं मेहुलला गालावर गोड किस दिली आहे. हा फोटो अतिशय सुंदर आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)


अभिज्ञा भावेचा नवरा मेहूल पै मुंबईत राहतो. ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते.


मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांनी अभिज्ञा आणि मेहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या ती रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.