जगभरात विविध बोलीभाषा आहेत. जवळपास 6,900 पेक्षा अधिक भाषा आहेत. जगभरातील विविध भाषांवर नजर ठेवणाऱ्या एथिनोलॉग या पब्लिकेशनच्या माहितीनुसार जगात 7,097 भाषा आहेत. यातील काही भाषा या हजारो वर्षं जुन्या असून अनेक भाषा लोप पावल्या आहेत. यामधीलच यघान हीदेखील एक भाषा आहे. अर्जेंटिनामधील एका बेटावरील ही प्राचीन भाषादेखील जवळपास संपुष्टात आली आहे. ही भाषा बोलू शकणारी केवळ एकच महिला या ठिकाणी जिवंत आहे.
या आजींना अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. यघान भाषेचं जतन केल्यामुळं त्यांना हे पुरस्कार मिळाले असून चिली सरकारने 2009 मध्ये त्यांना Living Human Treasure हा पुरस्कार देऊन गौरवलं आहे. एखाद्या संस्कृतीच्या रक्षणासाठी खूप मोठं योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा हा पुरस्कार युनेस्कोच्या पुरस्कारांमध्ये गणला जातो.
प्रामुख्याने यघान ही केवळ भाषा नव्हती तर तिथल्या लमाण समाजाचं नाव होतं. 1520 मध्ये पोर्तुगिजांनी हा समाज शोधला होता. मात्र हळूहळू ही भाषा लोप पावत गेली. सरकारच्या मदतीने या आजी यघान भाषा जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. यासाठी दरवर्षी उत्सवाचं आयोजनदेखील करण्यात येतं. शाळेमध्येदेखील लहान मुलांना ही भाषा शिकवण्याचं काम आजीबाई करतात.