अवयवदान म्हणजे जीवनदान. आपले अवयवदान करून कित्येक लोकांना नवं आयुष्य देता येतं. काही अवयव हे मृत्यूनंतर तर काही अवयव जिवंतपणीदेखील दान करता येतात. जिवंतपणी दान करता येणाऱ्या अवयवांपैकी एक म्हणजे किडनी.
2/ 9
जिवंतपणी किडनी दान करताना बहुतेक वेळा ज्या व्यक्तीला किडनीची गरज आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांचे रक्तगट जुळवले जातात, त्यांची आवश्यक ती चाचणी केली जाते आणि कुटुंबातील व्यक्तीच आपल्या प्रिय व्यक्तीला आपली किडनी देतात.
3/ 9
पती-पत्नी, पालक-मुलं, भावंडं, आजी-आजोबा आणि नातवंडं अशा नात्यांमध्ये किडनी दान होते आणि अशाच कुटुंबाअंतर्गत होणाऱ्या किडनी दान आणि प्रत्यारोपणाचं सर्वेक्षण करण्यात आलं.
4/ 9
गुजरातच्या अहमदाबादमधील डिसीज अँड रिसर्च सेंटर ऑफ द इन्स्टिट्युट ऑफ किडनीने कुटुंबाअंतर्गत होणाऱ्या अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाबाबत अभ्यास करण्यात आला.
5/ 9
दाम्पत्यांमध्ये 90% महिलांनी आपल्या पतीला आपली किडनी देऊन त्याचा जीव वाचवला आहे. तर फक्त 10% पुरुषांनीच आपल्या पत्नीला आपली किडनी दिली आहे.
6/ 9
फक्त पती-पत्नीच नव्हे तर पालकांनी आपल्या मुलांसाठी केलेल्या अवयवदानाचा विचार करता 70% आई म्हणजे महिला आणि 30% वडील म्हणजे पुरुष असं प्रमाण आहे.
7/ 9
आजी-आजोबांनी आपल्या नातवंडासाठी दान केलेल्या अवयवदानाबाबतची अशीच परिस्थितीत आहे. 75% महिला तर 25% पुरुषांनी आपले अवयव दान केलेत.
8/ 9
लहान मुलांच्या बाबतीत मात्र वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो. या वयात 40% मुली आणि 60% मुलांचं अवयवदान झालं आहे. तसंच जेव्हा भावंडांचा अहवाल तपासला तेव्हा महिला आणि पुरुषांमध्ये अवयवदानाचं प्रमाण सारखं असल्याचं दिसून आलं.
9/ 9
अवयवदान आणि अवयवप्रत्यारोपणामध्ये दिसून येणारी अश लैंगिक असमानता यामागील नेमकी कारणं माहिती नाहीत. मात्र ही खूप चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.