जगभरातील अनेक देश ऑनलाइन ट्रोल्सशी संघर्ष करीत आहेत. अनेक देशात याबाबत कडक कायदे नसल्याने ट्रोलर्स यांना शिक्षा होत नाही. मात्र ट्रोल्समुळे अनेकांच्या आयुष्यावर वाईट परिणाम झाल्याचे दिसते. अशात ट्रोल्सबाबत ऑस्ट्रेलिया सरकार आका कडक कायदे आणण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलिया असा कायदा तयार करीत आहे, ज्याअंतर्गत गंभीर ट्रोलिंगवर 81.7 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तावित कायद्याला ट्रोल्स विरोधात जगातील सर्वात मोठा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार रिव्हेंज पॉर्न सारख्या कंटेन्स पोस्ट करणाऱ्या लोकांवर लाखो रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. यासाठी ऑस्ट्रेलिया आपल्या ई-सेफ्टी कमिश्वरला जास्त अधिकार देण्याचा विचार करीत आहे.
ऑनलाइन जीवे मारण्याची धमकी दिल्यास मोठा दंड आकारण्यात येईल. नवं विधेयक ऑस्ट्रेलियाच्या संसदेत मंजुरी मिळविण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. संचार मंत्री पॉल फ्लेचर म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील अनेक लोकांना ऑनलाईन ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांचा असा गैरसमज झाला आहे की, इंटरनेटवर काहीही वाईट केलं तरी त्यातून वाचू शकतो.